Cloudy Weather Agrowon
हवामान

Hawaman Andaj : राज्यात तापमानातील वाढ कायम; राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज कायम

Weather Forecast : उत्तर भारतात थंडाचा कडका जाणवत आहे. आज हरियानातील हिस्सार येथे देशातील सर्वात कमी ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Anil Jadhao 

Pune News : ऐन हिवाळ्यात सध्या तापमान जास्त जाणवत आहे. दुपारी उन्हाचा चटका आणि ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरीही लावली. उत्तर भारतात थंडाचा कडका जाणवत आहे. आज हरियानातील हिस्सार येथे देशातील सर्वात कमी ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर भारतात थंडी कायम आहे. महाराष्ट्रात मात्र पावसाला पोषक हवामान झाल्याने उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळा झाला आहे. त्यामुळे किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली.

उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील बहुतांशी भागात तापमान ३० अंशाच्या पुढे आहे. यातच उन्हाचा चटका वाढल्याने बहुतांश ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पार गेले आहे. तर देशातील सर्वात कमी तापमान आज हरियानातील हिस्सार येथे होते. हिस्सारे येथे ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

मागील काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. आज आणि उद्या राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला नाही. मात्र ढगाळ वातावणर आहे. त्यामुळे थंडी गायब झाल्याची स्थिती आहे. राज्यात आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT