हवामान

Unseasonal Rain: काही भागात आजही पावसाचे वातावरण; राज्यातील तापमानाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता

IMD Update: राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचे सत्र सुरू असून तापमानाचा पारा चढ-उतार होत आहे. काही भागांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Anil Jadhao 

Pune News: ढगाळ हवामान आणि अवकाळीच्या वातावरणामुळे राज्यातील तापमान बहुतांशी भागात कमी दिसत आहे. आज काही भागात तापमानात वाढ दिसून आली. मात्र आजही राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने राज्यातील तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला.

हवामान विभागाने आज राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला. आज सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. यावेळी ३० ते ४० प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच यावेळी ३० ते ४० प्रतितास वेगाने वारे वाहतील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

सातारा, सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आज काही ठिकाणी ढगांच्या गडगडटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. शनिवारपासून पुन्हा राज्यातील काही भागात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

शनिवारी सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच राज्यातील तापमानात वाढ होण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीदराने सोयाबीन खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू करा

Labor Migration : रोजगाराअभावी पुसद तालुक्‍यात मजुरांचे स्थलांतर

Crop Damage Compensation : नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी २८.५३ कोटींचा निधी मंजूर

E-Peek Pahani : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई-पीक पाहणीकडे पाठ

Flood Crop Damage : संकटाच्या काळातही शेतजमिनी घेण्यासाठी चाचपणी

SCROLL FOR NEXT