Rain Update  Agrowon
हवामान

Weather Foreacst : विदर्भ, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान

Rain Update : उत्तर भारतातील राज्यांबरोबरच महाराष्ट्रातही दोन दिवासांपासून जोरदार वारे वाहत आहेत.

अमोल कुटे

Pune News : उत्तर भारतातील राज्यांबरोबरच महाराष्ट्रातही दोन दिवासांपासून जोरदार वारे वाहत आहेत. दिवसा उन्हाचा चटका कायम असला तरी सायंकाळनंतर हवेत गारठा अनुभवायला मिळत आहे. यातच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. रविवारपासून (ता. २५) विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पार गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. गुरुवारी (ता. २२) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात घट तर किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले.

विदर्भातही उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. आज (ता. २३) उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात चढ-उतार शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

गुरुवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.६ (१२.५), धुळे ३२.५ (१२.४), जळगाव ३१.८ (१४.४), कोल्हापूर ३३.६ (१६.३), महाबळेश्वर २६.९ (१४.२), मालेगाव ३५.० (१७.२), नाशिक २९.३ (१६.२), निफाड ३१.६ (१३.४), सांगली ३५.० (१६.९), सातारा ३३.५ (१३.५), सोलापूर ३६.० (१८.२), सांताक्रूझ ३०.० (२१.३), डहाणू ३०.५ (२०.५), रत्नागिरी ३१.४ (१७.८),

छत्रपती संभाजीनगर ३३.४ (१७.४), नांदेड ३४.० (१७.२), परभणी ३४.६ (१८.४), अकोला ३४.५ (१८.४), अमरावती ३३.४ (१७.५), बुलडाणा ३२.० (१७.६), चंद्रपूर ३५.४ (१८.०), गडचिरोली ३४.० (१५.०), गोंदिया ३३.० (१६.८), नागपूर ३५.०(१७.६), वर्धा ३५.०(१७.६), वाशीम ३५.८ (१४.४), यवतमाळ ३४.५ (१७.५).

कमी दाबाचा पट्टा सक्रिय

गुरुवारी (ता. २२) हरियानातील कर्नाल येथे सपाट भूभागावरील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उत्तर भारतात १६५ नॉट्स वेगाने जोरदार वारे वाहत आहे. महाराष्ट्रातही वाऱ्यांचा वेग वाढला आहे. मराठवाड्यापासून कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

NCCF Onion Procurement : ‘एनसीसीएफ’कडूनही माहिती देण्यास टाळाटाळ

MahaDBT : महा़डीबीटीकडून पूर्वसंमतीसाठी अडीच हजारांवर शेतकरी प्रतीक्षेत

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Lumpy Skin : खानदेशात ‘लम्पी’ प्रतिबंधक लसीकरण प्रक्रिया संथ

SCROLL FOR NEXT