Rain Alert  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Forecast: राज्यात पावसाचा जोर ओसरणार; विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Weather Update: वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने राज्यातील पाऊस ओसरण्याचे संकेत आहे. आज (ता. ३१) विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने राज्यातील पाऊस ओसरण्याचे संकेत आहे. आज (ता. ३१) विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून, बांगलादेशातील ढाक्यापासून वायव्येकडे ११० किलोमीटर उंचीवर आहे. भारताच्या बेहरामपूरपासून उत्तरेकडे १४० किलोमीटर आणि शिलाँगपासून २६० किलोमीटर नैर्ऋत्येकडे होते. ईशान्येकडे सरकत असलेली ही प्रणाली निवळू लागली आहे. शुक्रवारी (ता. ३०) दुपारी ही प्रणाली बांगलादेशातील सागर बेटे आणि खेपूपारा जवळ जमिनीवर आली आहे. या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरणार आहे.

शुक्रवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. आज (ता. ३१) विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :

कोकण : दोडामार्ग, सावंतवाडी ३०, कुडाळ, कणकवली प्रत्येकी २०.

मध्य महाराष्ट्र : बार्शी ५०, सोलापूर ३०, अक्कलकोट, गगनबावडा, पिंपळगाव बसवंत २०.

मराठवाडा : लोहारा १२०, भूम ७०, धाराशिव ६०, वाशी, धारूर प्रत्येकी ५०, बीड, उमरगा, पाटोदा प्रत्येकी ४०, शिरूर कासार, उमरी, निलंगा प्रत्येकी ३०.

विदर्भ : देवळी ३०, गोंदिया, वर्धा, कळंब, पांढरकवडा, राळेगाव प्रत्येकी २०.

‎शुक्रवारी (ता. ३०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३२.०---२३.८

अहिल्यानगर---३२.८---२३.७

‎‎धुळे---३८.०---२१.८

जळगाव---३९.०---२४.२

‎जेऊर---३२.०---२१.०

‎कोल्हापूर---२७.५---२३.९

‎महाबळेश्वर---२२.०---१९.०

मालेगाव---३३.८---२४.०

‎‎नाशिक---३१.३---२३.४

‎निफाड---३२.२---२३.४

‎सांगली---२८.३---२३.९

‎सातारा---३०.६---२४.१

‎सोलापूर---३२.१---२१.५

‎सांताक्रूझ---३३.२---२७.२

डहाणू---३३.४---२८.०

‎रत्नागिरी---३१.६---२७.८

‎छत्रपती संभाजीनगर---३३.४---२४.०

‎धाराशिव---निरंक---२०.४

‎परभणी---३४.२---निरंक

‎परभणी (कृषी)---३४.४---२२.७

‎अकोला---३५.४---२७.२

अमरावती---३५.८---२१.१

बुलडाणा---३३.३---२४.३

‎ब्रह्मपुरी---३८.०---२६.०

‎चंद्रपूर---३७.८---२५.०

‎गडचिरोली---३२.४---२४.८

‎गोंदिया---३५.४---२२.४

‎नागपूर---३७.८---२६

‎वर्धा---३६.०---२५.०

‎वाशीम---३३.४---निरंक

‎यवतमाळ---३५.४---२४.४

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Legislative Assembly: कृषिमंत्री कोकाटे यांची पावसाळी अधिवेशनाकडे पाठ

Pune APMC Scam: बाजार समिती संचालकांची ‘ईडी’मार्फत चौकशी करा

Guru Pournima 2025: गुरुपौर्णिमेला गुरुकुंजात गुरुदेवभक्तांची मांदियाळी

Pomegranate Price: डाळिंबाच्या एका क्रेटला साडेसहा हजार रुपये दर

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील गैरप्रकार बिहारमध्ये चालू देणार नाही

SCROLL FOR NEXT