Monsoon Update Agrown
हवामान

Monsoon Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर

Rain Forecast: राज्यात काही भागात पावसाची उघडीप आणि उन्हाचा चटका कायम आहे. परंतु आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Dhananjay Sanap

Pune News: राज्यात काही भागात पावसाची उघडीप आणि उन्हाचा चटका कायम आहे. परंतु आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसाचा अंदाज जाहीर केला आहे. 

आज म्हणजेच मंगळवारी पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. तर कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे, कोल्हापूर, सातारा,  सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तर मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा व वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर उर्वरित राज्यात मात्र ऊन-सावलीचा खेळासह हलक्या पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

तर राज्यात बुधवारी संपूर्ण कोकण, मराठवाडा आणी विदर्भातील जिल्हयांसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. तर भंडारा, गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी विजा व वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच गुरुवार आणि शुक्रवारी विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, पुणे तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: राज्यातील २१ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Mango Farmers: आंबा-काजू बागांच्या नुकसानीला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करा : शेट्टी

Farmers Issues: कापणी, मळणीचा खर्च शेतकऱ्यांना परवडेना

Power Wire Theft: वीजतारांच्या चोरीमुळे शेतकरी संकटात

LPG Shortage : "नागरिकांना घाबरू नका, असं आवाहन करणारे पंतप्रधान मोदीचं घाबरलेले आहेत"; एलपीजी गॅस टंचाईवरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका

SCROLL FOR NEXT