Rain In Maharashtra Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा जोर वाढला

Team Agrowon

Pune News : विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत गडचिरोलीतील सिरोंचा मंडलात सर्वाधिक २७५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. दरम्यान कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर राज्यातील ८९ मंडलांत १०० मिलिमीटरवर पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी पाऊस आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापुरांत जोरदार पाऊस आहे. पुणे, साताऱ्यात हलका पाऊस आहे.

विदर्भातील चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस आहे. गडचिरोलीत अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. अकोला, नागपूर जिल्ह्यांत जोरदार तर बुलडाणा, अमरावती, वाशीम, भंडाऱ्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तोतलाडोह, गोसी खुर्द अशा धरणांतील पाणीपातळी हळूहळू वाढत आहे.

येथे पडला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस

अलिबाग १०१, वौशी १११, किहीम, सरल १२८, जांभूळपाडा १०५, पेण १११, कामरली १११, महाड १२०, करंजवडी ११७, खारवली १०२, निजामपूर, इंदापूर १०४, पोलादपूर १०१, कोंडवी १०२, म्हसला १०३, दापोली १०७, पालगड १३५, वेळवी १०७, आंबवली ११४, कुळवंडी १२१, भरणे ११०, हेदवी ११८, रत्नागिरी १७८, खेडशी १३६, जयगड १३६, फसोप ११६, कोतवडे १४३.३, मालगुंड १२३, तरवल १४८, पाली १२८,

कडवी १०८, माखजन १११, फुणगुस १२९, फणसवणे ११३, आंगवली १३२, कोंडगाव १२७, देवळे १३७, देवरुख १३५, तुळसानी १३४, माभळ १२९, तेर्ये ११३, सौंदळ १२६, कुंभवडे १२८, ओणी ११६, पाचल १०९, पुनस ११२, पडेल ११४, शिरगाव १३१, पाटगाव १५७, बापर्डे १३१, पेंडूर १२७, मसूरे १४८, श्रावण १७७, आबेरी १२५, पोइप १७७, वेतोरे ११२, कणकवली १८०, फोंडा ११९, सांगवे १८०, नांदगाव १०५, तळेरे १३६, वागदे १६१, कुडाळ १३७, कडावल १७८.८, कसाल १४३, वालावल, माणगाव १२७, पिंगुळी १११, वैभववाडी १५६, येडगाव ११०, बांदा १२२, वेल्हा १०१.

घाटमाथ्यावर पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये

ताम्हिणी १६८, डुंगरवाडी १३३, खोपोली १२८, शिरगाव १२७, कोयना (पोपळी) १२६, कोयना (नवजा) ११६, दावडी १२०, लोणावळा ११९, भिरा १०५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT