Rain Update Agrowon
हवामान

Vidarbha Rain Update : विदर्भात पावसाची हजेरी

Weather News Update : विदर्भातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली.

Team Agrowon

Nagpur Rain Update : विदर्भातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता काही जिल्ह्यांत मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी रविवारी (ता. ४) कोसळल्या. ढगाळ वातावरण असल्याने वातावरणातही गारवा निर्माण झाला होता. विदर्भातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली.

त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा सुटल्याने अनेकांच्या घरांवरील टीनपत्रे उडून गेली. पावसाच्याही जोरदार सरी काही जिल्ह्यांत कोसळल्याची नोंद आहे. तर काही ठिकाणी केवळ रिमझिम पाऊस झाला. नागपूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला. १५ ते २० मिनिटे पावसाच्या सरी कोसळत होत्या. .

शनिवारी ( ता. ३) कडक उन्हाचा पार असताना अचानक वातावरणात बदल होऊन वादळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटाने शहरासह तालुक्यातील काही भागात झाडे उन्मळून पडली. वीजपुरवठा देखील काही काळ खंडित झाला होता.

तालुक्यातील सार्शी याठिकाणी मोठ्या नुकसानाची नोंद असून कांद्याचे नुकसान झाले आहे. सार्शी येथील पुंडलिक कानबाले, वानखडे यासह इतर नागरिकांचे नुकसान झाले.

शेंदूरजना घाटला पावसाने झोडपले

शेंदूरजनाघाट : शनिवारी दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन वादळी पावसात रूपांतर झाले. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेंदूरजनाघाट-तिवसाघाट, रवाळा-वरुड, शेंदूरजनाघाट ते धनोडी या रस्त्यावरील मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली.

झाडे तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तिवसाघाट बसस्टँडवरील जुने पिंपळाचे झाड पडल्याने काही काळ वाहतूक बंद होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price: कोल्हापुरात ऊसदराची कोंडी कायम; साखर कारखानदारांच्या भूमिकेकडे लक्ष

Farmer Compensation Delay: केवायसी पूर्ण नसल्याने शेतकऱ्यांचा पीक नुकसान मदतनिधी रखडला

Soil Testing: माती परीक्षणातून खतांचा संतुलित वापर करा; पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Ujani AI Data Center: उजनीतील ‘एआय डेटा सेंटर’ला विरोध

Financial Assistance for Farmers: शेतकरी, शेतमजुरांना स्वतंत्र आर्थिक साह्य द्या; खासदार भगरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT