Rain Update Agrowon
हवामान

Monsoon Rain : पाऊस कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार ? राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज कायम

Weather News : पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये देशाच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. तर राज्यातील अनेक भागात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात जोरदार सरी पडत आहेत. तर अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला दिसतो. माॅन्सूनने आज प्रगती केली नाही. पण माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असल्याने पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये देशाच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. तर राज्यातील अनेक भागात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज आहे. 

माॅन्सूनने काल राज्यातील काही भागात प्रवेश केला होता. माॅन्सून अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत पोचलेला आहे. पण आज माॅन्सूनची प्रगती केली नाही. माॅन्सूनने आतापर्यंत मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे. तर तेलंगणाचा संपूर्ण भागही व्यापला. तसेच छत्तीसगडच्या आणखी काही भागात माॅन्सून पोचला आहे. आज प्रगती नसल्याने माॅन्सूनची सिमा आजही नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम या भागात होती. 

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढीच्या ३ ते ४ दिवसांमध्ये माॅन्सून ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर उद्या विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिला. तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे. 

शनिवारी, रविवारी आणि सोमवारी संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. तसेच राज्याच्या इतर भागातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT