Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर कमीच राहणार; पूर्व विदर्भात दोन दिवस पावसाची शक्यता

IMD Rain Forecast: हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमी झाला. विदर्भात पावसाची उघडीप आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पाऊस कमीच आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज दिला.

वायव्य मध्य प्रदेश आणि शेजारच्या पूर्व राजस्थानच्या दरम्यान कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. हे कमी दाब क्षेत्र वायव्येकडे सरकले असून नैऋत्य राजस्थान आणि वायव्य मध्य प्रदेशच्या दरम्यान ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच माॅन्सून ट्रफ बिकानेर, सिध्दी, रांची, नैऋत्य पश्चिम बंगाल ते बांगलादेश दरम्यान आहे.

राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि नाशिक, धुळे तसेच नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. विदर्बातील नागपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या धुळे आणि नंदूरबार तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.

बुधवारी विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच कोकणात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, अशी शक्यता आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भात पावसाची उघडीप राहील. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT