Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यात पाऊस, उष्णतेच्या लाटेचा इशारा; विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चढला

Weather Forecast : हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर काही ठिकाणी पावसाचाही अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण तर काही भागात उष्णतेची लाट, अशी परिस्थिती निर्माण झाली. विदर्भ चांगलाच तापत आहे. हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर काही ठिकाणी पावसाचाही अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. तर धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती लातूर, धाराशिव,  संभाजीनगर, जालना जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी ठिकाणी तापमान वाढेल, असाही अंदाज दिलाय. 

उद्या म्हणजेच शनिवारी नाशिक, हिंगोली, धाराशिव, लातूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर अकोला, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. 

देशातील बहुतांशी भागात तापमानात वाढ झाली. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला झाली. येथे ४२.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर देशातील अनेक भागात तापमानाचा पारा आता ४० अंशापार पोचला. तसेच तापमानात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rural Water Scarcity: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपाययोजना

Sugarcane Crushing Season: ऊस हंगामास आजपासून प्रारंभ; शेतकरी संघटनांची हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मागणी

October Heat Stress: ऑक्टोबर हीटमध्ये पालेभाज्यांवर ताणाची शक्यता, वेळीच घ्या काळजी

Cooperation Minister's Assurance: सहकारमंत्र्यांच्या आश्वासनाकडे सर्वांचे लक्ष; साखर उद्योग संघटनांनी दिली आठ दिवसांची मुदत

Mahavitaran Employees Protest: ‘महावितरण’विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा आक्रोश; द्वारसभेतून मागण्यांना आवाज

SCROLL FOR NEXT