Rain Forecast Agrowon
हवामान

Marathwada Rain: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; राज्यात दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता

Weather Update: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील २ ते ५ दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. ढगाळ हवामानामुळे तापमानातही घट झालेली दिसत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील २ ते ५ दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला.

मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी दोन दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. तर लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर , जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यातही दोन दिवसांनंतर पावसाला पोषक हवामान राहण्याची शक्यता आहे.

विदर्भातही काही भागात पावसाला पोषक हवामान आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला.

तर यवतमाळ, वाशीम आणि वर्धा जिल्ह्यात शुक्रवार ते रविवार असे तीन पावसाचा अंदाज देण्यात आला. तसेच नागपूर, गोंदीया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. तर शनिवारी आणि रविवारी कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT