Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain: उद्यापासून या भागात पावसाचा अंदाज; तापमानातील चढ उतार सुरुच

Rain Update : राज्यातील तापमानात सध्या चढ उतार दिसून येत आहेत. मात्र शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस नाही.

अनिल जाधव

Pune News : राज्यातील तापमानात सध्या चढ उतार दिसून येत आहेत. मात्र शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस नाही. पण हवामान विभागाने उद्यापासून दोन दिवस राज्याच्या भागात पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने उद्या आणि परवा म्हणजेच शनिवारी आणि रविवारी काही भागात पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने उद्या सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.

या दोन्ही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे. तसेच यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

यासोबतच रविवारी सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

तर ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. तसेच रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात विजांसह लक्या सरी काही भागात पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Policy: ‘बांबू धोरण २०२५’ राबविण्याचे आदेश

Mahavistar App: कोणत्या हंगामात काय पेरायचं, कधी विकायचं?

India Russia Relations: पंतप्रधान मोदी दबावाला बळी न पडणारे नेते

Sugar Mills: कोट्यापेक्षा जास्त साखर विक्री केल्यास दंडात्मक कारवाई

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वितरण संथ गतीने

SCROLL FOR NEXT