Rain Alert Agrowon
हवामान

Rain Alert : राज्यात उद्यापासून पावसाचा अंदाज; मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागातही जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Forecast : उद्यापासून राज्यातील बहुतांशी ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप होती. पण उद्यापासून राज्यातील बहुतांशी ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील काही भागात आजही जोरदार पाऊस झाला. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. उद्या हवामान राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

विदर्भातील सर्व जिल्हे, मराठवाड्यातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

रविवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

तसेच विदर्भातील इतर जिल्हे, मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

सोमवारी आणि मंगळवारीही विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील बहुतांशी भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, नगर आणि खानदेशातही काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Electric Tractor Subsidy : इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला अनुदान, एआयचा वापर आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहनाची शिफारस; स्थायी समितीचा अहवाल सादर

Soybean Procurement: पाच लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी शिल्लक आहे का?; पणनमंत्र्यांचा मोठा खुलासा

Organic Turmeric Branding: वाशीमच्या सेंद्रिय हळदीचे होणार ब्रँडिंग

Farmer Struggle Story: कैलास नागरेंच्या बलिदानाची वर्षपूर्ती

Soil Health: एकात्मिक खत व्यवस्थापनातून राखा जमिनीचे आरोग्य

SCROLL FOR NEXT