Monsoon Update 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023 : राज्यात 'या' भागात जोर वाढण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Monsoon Rain update : राज्याच्या काही भागात पावसाला पोषक हवामान आहे. तर हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला.

Team Agrowon

Maharashtra Weather Update : राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप आहे. काही ठिकाणी हलक्या सरी होत असल्या तरी जोर मात्र कमीच आहे. राज्याच्या काही भागात पावसाला पोषक हवामान आहे. तर हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला. 

माॅन्सूनचा आस असलेला पश्चिमेकडील सक्रीय कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीपेक्षा दक्षिणेकडे झुकलेला आहे. तर पुर्वेकडील सक्रीय कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीपेक्षा उत्तरेकडे झुकलेला आहे. माॅन्सूनचा आस असलेला हा कमी दाबाचा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर असून जैसलमेर, सिकर, ओराई, सुलतानपूर, पटना, मालदा आणि अरुणाचल प्रदेशच्या पुर्वेकडील भागात विस्तारलेला आहे.

ईशान्य राजस्थान आणि नैऋत्य मध्य प्रदेशाच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही चक्राकार वाऱ्याची स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच दक्षिण हरियाना आणि शेजारच्या परिसरात १.५ किलोमीटर उंचीवर एक चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात वायव्येकडे उत्तर तमिळनाडूच्या भागातही एक चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसापाटीपासून ४.५ किलोमीटर आणि ७.६ किलोमीटर उंचीच्या दरम्यान आहे.  तसेच ही चक्राकार वाऱ्याची स्थिती वायव्येकडे झुकलेली आहे. यामुळे राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. 

मागील दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळाली. उन्हाचा चटकाही काही भागात जाणवत आहे. आज कोकणातील सिंधुदूर्ग आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमवरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदीया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवडा आणि खानदेशातही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT