Weather Agrowon
हवामान

Paus Andaj: मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज; तसेच राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचाही इशारा

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच मराठवाडा, विदर्भ, आणि काही कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज व काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Anil Jadhao 

Pune News: मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. मात्र उद्यापासून काही भागात पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला. तर काही ठिकाणी उष्णतेची लाटही कायम आहे.

मराठवाड्यातील जालना, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा आज आणि उद्या अंदाज देण्यात आला. तर बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आज आणि उद्या काही भागात उष्णतेची लाट असेल तर उद्यापासून या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला.

विदर्भातील अनेक भागात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. अकोला जिल्ह्यात आजपासून तीन दिवस, अमरावती, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने दिला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात शनिवार ते सोमवार काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

विदर्भातील भंडारा, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. सोलापूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

सांगली जिल्ह्यात उद्यापासून ३ दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. सातारा जिल्ह्यात शनिवारी तर कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी आण सोमवारी पावसाचा अंदाज देण्यात आला. सिंधुदूर्ग जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे. तर पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णआणि दमट हवामानाचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT