Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भात तीन दिवस पावसाचा अंदाज; राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज

Weather Update : विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर तुरळक ठिकाणी गारपीटीची काहीशी शक्यताही जाणवते. पण पावसाचे वातावरण निवळल्यानंतर राज्यातील थंडीही कमी होईल.

Anil Jadhao 

Pune News : विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर तुरळक ठिकाणी गारपीटीची काहीशी शक्यताही जाणवते. पण पावसाचे वातावरण निवळल्यानंतर राज्यातील थंडीही कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. 

माणिकराव खुळे म्हणाले की, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये आज, उद्या आणि परवा, म्हणजेच शनिवार ते सोमवार दरम्यान तीन दिवस तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच उंचीच्या वेगवेगळ्या पातळीवर दोन्हीही समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे वातावरणात अस्वस्थ अवस्थाही निर्माण होऊ शकते.

त्यामुळे विशेषतः उद्या म्हणजेच रविवारी एक दिवस अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तसेच लगतच्या परिसरात तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही, असाही अंदाज श्री. खुळे यांनी दिला. 

तसेच महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र गारपीटीची कोणतीही शक्यता जाणवत नाही. कोकण वगळता उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात फक्त आज आणि उद्या म्हणजेच शनिवार, रविवारी ढगाळ वातावरणाची व अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता ही कायम आहे. मुंबईसह कोकणात मात्र स्वच्छ वातावरण राहून पावसाची कोणतीही शक्यता नाही, असेही खुळे यांनी सांगितले.

विदर्भातील पावसाळी वातावरण मावळल्यानंतर मंगळवारपासून महाराष्ट्रातील थंडी कायमचीच गायब होऊ शकते. त्यामुळे ह्या वर्षीच्या हिवाळी हंगामाच्या थंडीची सांगता झाली, असेच समजावे.  महाराष्ट्रातून थंडी लवकर गेल्यामुळे शेतपिकावर परिणाम जाणवेल. सध्या हुरड्यावर आलेली धान्यपिके एकाकी ओढून येऊन परतणीच्या मार्गावर असतील, असे खुळे यांनी स्पष्ट केले.

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. म्हणजेच ह्या ५ जिल्ह्यांमध्ये दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जो काही सरासरी इतका पहाटेचा गारवा जाणवत असे त्या ऐवजी अधिक ऊबदारपणा जाणवेल. म्हणजे थंडी तर लवकर गेलीच पण त्याऐवजी त्या ठिकाणी व काळात अधिकची उष्णता जाणवण्यास लवकरच सुरवात होईल, असाही अंदाज श्री. खुळे यांनी दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT