Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज; शुक्रवारपासून राज्यातील बहुतांशी भागात पाऊस वाढण्याची शक्यता

Rain Alert : राज्यात कालपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला. तर राज्याच्या अनेक भागात आज आणि उद्या पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात कालपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला. तर राज्याच्या अनेक भागात आज आणि उद्या पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. दोन दिवसांनंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज आणि उद्या कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. उद्या जळगाव, विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर आणि नांदेड  जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

शुक्रवारी मराठवाड्यातही पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

शनिवारी आणि रविवारी राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची हजेरी राहण्याचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशातही सर्वच जिल्ह्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT