Monsoon Rain Agrowon
हवामान

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Rain Forecast : शनिवारी मराठवाड्यात तर रविवार आणि सोमवार विदर्भात मध्यम पावसाचा तुरळक ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Dhananjay Sanap

Pune News : राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक हवामान होत आहे. मागील आठवडाभर पावसानं उघडीप दिली. त्यामुळं उन्हाचा चटका काहीसा वाढला. गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी लावण्याची शक्यता आहे. तर शनिवारी मराठवाड्यात तर रविवार आणि सोमवार विदर्भात मध्यम पावसाचा तुरळक ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

गुरुवार आणि शुक्रवारी राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात हलक्या सरीची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यात मुख्यत: उघडीपीचा अंदाज आहे.

शनिवारी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजा आणि वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. 

तसेच रविवारी नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वारे आणि विजासह येलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.  

सध्या विविध भागात सोयाबीन कापणीची कामं सुरू आहेत. तसंच काही भागात कापूस वेचणीच्या अवस्थेत आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी कामं उरकून घ्यावीत. तसेच कापणी केलेल्या पिकांना झाकून घ्यावं, असं आवाहन कृषी विद्यापीठांकडून करण्यात आलं आहे. आज राज्यातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT