Weather Update Agrowon
हवामान

Rain Forecast : विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस उघडीप देण्याची संकेत आहेत.

Team Agrowon

Weather Update पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस (Heavy Rain) उघडीप देण्याची संकेत आहेत.

आज (ता. २०) विदर्भात विजांसह पावसाचा शक्यता (Rain Forecast) आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज (Weather Forecast) आहे. तर राज्याच्या कमाल तापमानात ३ ते ५ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पावसाची हजेरी ढगाळ वातावरण यामुळे राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्रात येथे राज्यतील उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे कायम होता.

दक्षिण कर्नाटकपासून मराठवाडा, पश्चिम विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने आज (ता. २०) विदर्भाच्या काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता असून, मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.४ (१५.०), जळगाव ३४.५ (१६.७), धुळे ३३.० (१२.८), कोल्हापूर ३२.१ (१९.९), महाबळेश्वर २५.८ (१२.४), नाशिक ३१.५ (१४.५), निफाड ३५.६(१४.६),

सांगली ३२.२ (१९.२), सातारा ३१.१ (१५.७), सोलापूर ३३.८(१८.५), सांताक्रूझ ३३.४ (२३.१), डहाणू ३१.० (२२.०), रत्नागिरी ३२.४ (२२.३), छत्रपती संभाजीनगर ३०.० (१२.४),

नांदेड ३०.२ (१८.६), परभणी ३१.९(१६.६), अकोला ३१.३ (१५.९), अमरावती २९.५(१६.३), बुलढाणा ३१.० (१५.५), ब्रह्मपूरी २८.४ (१८.८),

चंद्रपूर २८.६ (९.६), गडचिरोली २५.०(१८.६), गोंदिया २६.० (१८.२), नागपूर २८.० (१९.०), वर्धा ३०.५(१९.४), वाशीम ३२.० (१५.०), यवतमाळ २९.५ (१६.०).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

Digital Fertilizer Distribution: जिल्ह्यात आजपासून मोबाइल ॲपद्वारे खत वितरण

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT