Monsoon Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भात पाऊस जोर धरण्याची शक्यता

Rain Alert : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज (ता. ३१) विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) आहे.

अमोल कुटे

Pune News : गुजरातमधील वादळी प्रणालीची तीव्रता वाढत असतानाच राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. यातच पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज (ता. ३१) विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सरकला आहे. गुजरातमधील कच्छच्या किनाऱ्यावरील वादळी प्रणालीपासून (डीप डिप्रेशन) मालेगाव, ब्रह्मपुरी, जगदलपूर, कलिंगपट्टम, मध्य बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाच्या केंद्रापर्यंत आहे. यातच दक्षिण गुजरातपासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पावसाच्या उघडिपीमुळे तापमानाचा पारा तिशी पार गेल्याने राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली. शुक्रवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ३४ अंश तापमानाची नोंद झाली.

कोकण, घाटमाथ्यावरील पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. ३१) विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकणासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाचा धोका नाही

गुजरातमधील वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) अरबी समुद्राकडे सरकली असून, शुक्रवारी (ता. ३०) रात्रीपर्यंत या भागात चक्रीवादळ घोंघावणार आहे. ही प्रणाली किनाऱ्यापासून दूर वायव्येकडे सरकत असल्याने भारतभूमीला त्याचा धोका नाही. शुक्रवारी (ता. ३०) ही प्रणाली गुजरातच्या भूजपासून १६० किलोमीटर पश्चिमेकडे, नालियापासून ७० किलोमीटर वायव्येकडे होती. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र ठळक झाले असून, ही प्रणाली दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. या प्रणालीची तीव्रता आणखी वाढण्याचे संकेत आहेत.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Water Tourism: उजनी जलपर्यटनाचे भवितव्य अंधारात

Agriculture Officer Retirement: नाशिक ‘झेडपी’चे कृषी विकास अधिकारी शेवाळे सेवानिवृत्त

Revenue Department: अधिकाऱ्यांनी गावांत जाऊन समस्या सोडवाव्या: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Water Scheme Delayed: पाणी योजना चार वर्षांपासून रखडली

Summer Fruits Sale: चिंच-बोरांच्या विक्री हंगामाला सुरुवात

SCROLL FOR NEXT