Monsoon Agrowon
हवामान

Monsoon : राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे; कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वाढणार जोर

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Dhananjay Sanap

राज्यात मागील दोन दिवसांपासून काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ओढे, नदी, नाले भरून वाहत आहेत. तर धरणाच्या पाणी पातळीत काहीशी वाढ झाली आहे. परंतु पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसाचा अंदाज दिला आहे.

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयाला विजा ढगांच्या गडगडाटासह अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर उर्वरित कोकणात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यांसोबत मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मॉन्सूनच्या परतीसाठी वायव्य राजस्थान आणि लगतच्या भागात येत्या दोन ते तीन दिवसात पोषक स्थिती निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार झाली आहे. आज संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूरम् धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी तर विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

तसेच पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर अधिक राहणार असून रविवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मॉन्सूनची परती सीमा आजही जैसे थे होती. मॉन्सूनने २५ सप्टेंबर रोजी राजस्थानमधील राजस्थानमधील नौखरा, जोधपूर, बारमेर माघार घेतली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT