Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023 : माॅन्सून आजही बरसणार; कोणकोणत्या भागात जोर वाढणार?

Monsoon Rain Update : माॅन्सूनन दोनच दिवसांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, जम्मू- काश्मीर व्यापले होते. काल माॅन्सूनने उत्तर अरबी समुद्राचा बहुतांशी भाग, संपूर्ण गुजरात आणि राजस्थानच्या बहुतांशी भागात प्रगती केली होती.

Team Agrowon

Today Monsoon Update : देशाच्या बहुतांशी भागात माॅन्सून दाखल झाला. तर राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी होत आहेत. पण अद्यापही काही भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. राज्याच्या अनेक भागात आज माॅन्सूनच्या सरी होण्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला.

माॅन्सूनने सोमवार्यंत देशातील बहुतांशी भाग व्यापला होता. मागील चार दिवसांमध्ये माॅन्सूनने वेगाने प्रगती केली. पोषक हवामान असल्याने माॅन्सूनचा प्रवास सुकर झाला.

माॅन्सूनन दोनच दिवसांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, जम्मू- काश्मीर व्यापले होते. काल माॅन्सूनने उत्तर अरबी समुद्राचा बहुतांशी भाग, संपूर्ण गुजरात आणि राजस्थानच्या बहुतांशी भागात प्रगती केली होती. माॅन्सूनची सिमा आज जोधपूर, सिकर, नरनौल, फिरोजपूरपर्यंत होती.

आजही माॅन्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान होते. त्यामुळे आज माॅन्सूनने राजस्थानच्या काही भागात प्रगती केली. तसेच उत्तर अरबी समुद्राचा संपूर्ण भाग माॅन्सूनने व्यापला. आज माॅन्सूनची सिमा बिकानेर, नरनौल, फिरोजपूरपर्यंत होती.

माॅन्सून देशाचा संपूर्ण भाव व्यापण्यासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांमध्ये माॅन्सून राजस्थानचा उर्वरित भाग व्यापेल. तसेच पंजाब आणि हरियनाच्या संपूर्ण भागात दाखल होईल. याचाच अर्थ असा की माॅन्सून संपूर्ण भारत व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला.

माॅन्सून देशाच्या बहुतांशी भागात दाखल झाल्याने ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. आज महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली. सोबतच मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकासह देशभरात ठिकाठिकाणी पावसाच्या सरी होत आहेत.

आज राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाला पोषक हवामान आहे. आज राज्याच्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर नाशिक, नंदूरबार, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pauas Andaj: काही भागात हलक्या पावसाचा अंदाज; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज

Cooperative Bank Jobs: भरतीमध्ये भूमिपुत्रांसाठी ७० टक्के जागा राखीव

Yashwantrao Krishi Mahotsav: राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सवाला प्रतिसाद

Ratnagiri Farmers Crop Loss : रत्नागिरी जिल्ह्यात ४ हजारांवर शेतकऱ्यांचे ७७२ हेक्टरचे नुकसान

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत २१ निर्णय; अतिवृष्टीच्या मदतीवरून खडाजंगी

SCROLL FOR NEXT