Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update IMD 2023 : मॉन्सून शुक्रवारपर्यंत अंदमानात दाखल होणार; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon IMD : शुक्रवारपर्यंत (ता. १९) मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागने वर्तविली आहे.

Team Agrowon

Monsoon News : यंदाच्या मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव राहू शकतो, अशी चर्चा सुरू असतानाच बंगालच्या उपसागरातील 'मोचा' चक्रीवादळ निवळल्यानंतर अंदमान, निकोबार बेट समुहावर नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल होण्यास पोषक हवामान झाले आहे.

शुक्रवारपर्यंत (ता. १९) मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागने वर्तविली आहे.

दीर्घकालीन मॉन्सून दाखल होण्याच्या वेळा बघता दरवर्षी मॉन्सून साधारण २२ मे च्या दरम्यान अंदमानात दाखल होतो. त्यानंतर साधारण ७ जूनला राज्यात दाखल होतो.

यंदाही मॉन्सून वेळेवर दाखल होईल, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

मागील वर्षी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन तीन दिवस आधी म्हणजेच २९ मे रोजी झाले होते.

स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने मॉन्सूनचं आगमन उशिरा होईल, असा अंदाज मंगळवारी (ता.१६) जाहीर केला होता.

त्यामुळे यंदा मॉन्सून अंदमानमध्ये उशिरा दाखल होईल, असं स्कायमेटने म्हंटलं आहे. तळकोकणात ७ जून रोजी तर मुंबईमध्ये ११ जून रोजी मॉन्सून दाखल होईल, असा अंदाजही स्कायमेटने वर्तवला आहे.

दरम्यान, देशात मॉन्सून सर्वसाधारण (नॉर्मल) राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला. यंदा सरासरीच्या तुलनेत ९६ टक्के पाऊस पडेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT