Monsoon Update Skymate 2023 Agrowon
हवामान

Monsoon Update Skymate 2023: यंदा मॉन्सून उशिरा दाखल होणार; 'स्कायमेट' संस्थेचा अंदाज

Monsoon Update : यंदा मॉन्सूनची गती संथ राहील. त्यामुळे मॉन्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज स्कायमेट वेदर या खाजगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.

Team Agrowon

Monsoon News : यंदा मॉन्सूनची गती संथ राहील. त्यामुळे मॉन्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज स्कायमेट वेदर या खाजगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. दरवर्षी २२ मे रोजी मॉन्सून दाखल असतो. परंतु यंदा मॉन्सूनची गती संथ दिसत आहे.

त्यामुळे यंदा मॉन्सून अंदमानमध्ये उशिरा दाखल होईल, असं स्कायमेटने म्हंटलं आहे. तळकोकणात ७ जून रोजी तर मुंबईमध्ये ११ जून रोजी मॉन्सून दाखल होईल, असा अंदाजही स्कायमेटने वर्तवला आहे.

दरवर्षी केरळात १ जून रोजी नैऋत्य मॉन्सून दाखल होत असतो. परंतु यंदा त्याबद्दल निश्चित सांगणं कठीण आहे, असं स्कायमेटनं म्हंटलं आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मॉन्सूनच्या आगमनाबद्दलची तपशील जाहीर करण्यात येतील.

स्कायमेट ही हवामान अंदाज वर्तवणारी संस्था आहे. हवामानबद्दल अंदाज देण्याचं काम ही संस्था करते. मॉन्सूनच्या दाखल होण्याबद्दल स्कायमेट आणि भारतीय हवामान शास्त्र विभागात गेल्यावर्षी खटके उडाले होते.

यंदा मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु त्याबद्दलचं चित्र अजून तरी पूर्णत: स्पष्ट नाही. यंदा दीर्घकालिन सरासरीच्या ९४ टक्के पाऊस होईल, तसेच महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील, असे स्कायमेटने म्हटले होते.

तर देशात मॉन्सून सर्वसाधारण (नॉर्मल) राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला. यंदा सरासरीच्या तुलनेत ९६ टक्के पाऊस पडेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT