Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023 : माॅन्सूनची वाट रखडली; पुन्हा वाटचाल कधी सुरु होणार?

Cyclone Biparjoy : बिपरजाॅय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. उद्या सायंकाळी गुजरातमधील जखाऊ बंदरावर हे चक्रीवादळ धडकणार आहे.

Team Agrowon

Cyclone Update : बिपरजाॅय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. उद्या सायंकाळी गुजरातमधील जखाऊ बंदरावर हे चक्रीवादळ धडकणार आहे.

या चक्रीवादळामुळे गुजरात आणि शेजारच्या भागांमध्ये वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावली. मग माॅन्सूनची वाटचाल अडखळी आहे.

ईशान्य अरबी समुद्रात अतितीव्र चक्रीवादळ किनारपट्टीकडे सरकत आहेत. चक्रीवादळ ३ किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करत आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ बंदराच्या उत्तर नैऋत्यला २८० किलोमीटर आहे.

तर देवभुमी द्वारकेच्या उत्तर नैऋत्यला २९० किलोमीटर आणि नालियाच्या उत्तर नैऋत्यला ३०० किलोमीटर आणि पोरबंदपासून ३५० किलोमीटर तसेच पाकिस्तानमधील कराचीपासून दक्षिण नैऋत्यला ३४० किलोमीटर अंतरावर आहे.

हे चक्रीवादळ उद्या संध्याकाळी गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची जवळच्या जखाऊ बंदराजवळ जमिनीवर येण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ अतितीव्र झाले असून १२५ ते १३५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

मॉन्सून ८ जून रोजी देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये डेरेदाखल झाला होता. त्यानंतर साधारणतः ७ जूनपर्यंत तळकोकणात येणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने दाखल झाला.

माॅन्सूनने सोमवारी कोकण, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये प्रगती केली होती. पण कालपासून माॅन्सूनने प्रगती केली नाही. माॅन्सून तीन दिवसांपासून एकाच ठिकाणावर ठाण मांडून आहे.

आजही माॅन्सूनची सिमा रत्नागिरी, कोप्पाल, पुट्टापारथी, श्रीहरीकोटा, मालदा आणि फोरबेसगंज या भागात होती. पण १८ ते २१ जूनच्या दरम्यान माॅन्सून दक्षिण द्वीपकल्पाचा आणखी काही भाग, पूर्व भारत आणि शेजारच्या भागात प्रगती करु शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

दरम्यान, चक्रीवादळामुळे गुजरातच्या आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला. या जिल्ह्यातील ३७ हजार ८०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. कच्छ आणि सौराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडत आहे. मागील २४ तासांमध्ये खंबालिया येथे १२० मिलिमटर पावसाची नोंद झाली. उद्या सौराष्ट्र आणि कच्छ भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT