Biporjoy Cyclone : बिपरजाॅय चक्रीवादळाचा गुजरात किनाऱ्याला तडाखा बसण्यास सुरुवात!

Cyclone Update : बिपरजाॅय चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून गुजरात किनारपट्टीवरून जोराचे वारे वाहत आहेत. उद्या सायंकाळी चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ बंदराजवळ धडकण्याची शक्यता आहे.
Biporjoy Cyclone
Biporjoy CycloneUpdate

Gujrat Cyclone Update : बिपरजाॅय चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून गुजरात किनारपट्टीवरून जोराचे वारे वाहत आहेत. उद्या सायंकाळी चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ बंदराजवळ धडकण्याची शक्यता आहे.

सौराष्ट्र आणि कच्छ भागात रेट अलर्ट देण्यात आला असून ३७ हजार ८०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा गुजरातला मोठा तडाखा बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ईशान्य अरबी समुद्रात अतितीव्र चक्रीवादळ किनारपट्टीकडे सरकत आहेत. सकाळी ९.४५ वाजेपर्यंतच्या मागील सहा तासांमध्ये चक्रीवादळ ३ किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करत आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ बंदराच्या उत्तर नैऋत्यला २८० किलोमीटर आहे.

तर देवभुमी द्वारकेच्या उत्तर नैऋत्यला २९० किलोमीटर आणि नालियाच्या उत्तर नैऋत्यला ३०० किलोमीटर आणि पोरबंदपासून ३५० किलोमीटर तसेच पाकिस्तानमधील कराचीपासून दक्षिण नैऋत्यला ३४० किलोमीटर अंतरावर आहे.

Biporjoy Cyclone
Biporjoy Cyclone : ‘बिपॉरजॉय’ झेपावतंय गुजरातकडे

हे चक्रीवादळ उद्या संध्याकाळी गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची जवळच्या जखाऊ बंदराजवळ जमिनीवर येण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ अतितीव्र झाले असून १२५ ते १३५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

बिपरजाॅय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने प्रवास करत आहे. वादळामुळे पोरबंदर भागात जोरदार वारे वाहत असून अनेक झाडेही उन्मळून पडली. भारतीय हवामान विभागाने गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ भागात बिपरजाॅय चक्रीवादळामुळे रेड अलर्ट दिला. चक्रीवादळ

जखाऊ हे भूज येथील महत्वाचे बंदर आहे. या बंदरावर मासेमारी करणाऱ्या शेकडो बोटी उभ्या आहेत. सरकारने चक्रीवादळामुळे मासेमारीवर तात्पुरती बंदी घातली आहे. पण किनाऱ्यावर उभ्या असलेल्या बोटींचे नुकसान होण्याची भीती मच्छीमार व्यक्त करत आहेत.

ईशान्य अरबी समुद्रातील या चक्रीवादळामुळे मुंबईच्या किनाऱ्यावर लाटा आदळत आहेत. समुद्र खवळल्याने लाटांचे प्रमाण वाढले. चक्रीवादळामुळे किनाऱ्यावरील समुद्र पाणीपातळीतही वाढ दिसू शकते, त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Biporjoy Cyclone
Cyclone Biporjoy : गणपतीपुळेत ‘बिपॉरजॉय’च्या प्रभावाने समुद्र किनारी नुकसान

चक्रीवादळाचा गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र किनाऱ्याला तडाखा बसण्याची शक्यता आहे. गुजरात राज्य सरकारने समुद्र किनाऱ्यालगतच्या आठ जिल्ह्यातील ३७ हजार ८०० लोकांचे स्थलांतर केले आहे. केंद्र सरकारने द्वारकेत ४०० छावण्या तयार केल्या आहेत. स्थलांतरीत लोकांना येथे हलविण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितले.

अरबी समुद्रात बिपरजाॅय चक्रीवादळामुळे पाकिस्तानमधील काही भागांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. पाकिस्तानमधील बलोचिस्तान सरकारने किनारी भागात राज्य आणीबाणी जाहीर केली. माक्रण बागात १४४ कलम लागू करण्यात आल्याचे येथील स्थानिक प्रशासनाने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com