Monsoon Update 2023 Agrowon
हवामान

Monsoon Update 2023 : माॅन्सूनची चाल मंदावली; चक्रीवादळ देशातच धडकणार

Weather Update : देशातील काही भागांमध्ये काल माॅन्सूनने प्रगती केली होती. पण आज माॅन्सूनचा प्रवास कालच्याच जागेवर होता. आज माॅन्सूनने प्रगती केली नाही.

Team Agrowon

Weather Update in Maharashtra : देशातील काही भागांमध्ये काल माॅन्सूनने प्रगती केली होती. पण आज माॅन्सूनचा प्रवास कालच्याच जागेवर होता. आज माॅन्सूनने प्रगती केली नाही. तर दुसरीकडे बिपरजाॅय चक्रीवादळामुले गुजरात आणि राजस्थानमधील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे.

तर १५ जूनला सायंकाळी हे वादळ गुजरातमधील जखाऊ बंदराजवळ धडकण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

मॉन्सून ८ जून रोजी देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये डेरेदाखल झाला होता. त्यानंतर माॅन्सूनने मजल दरमजल करत प्रवास सुरु केला. साधारणतः ७ जूनपर्यंत तळकोकणात येणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने दाखल झाला. बिपरजाॅय चक्रीवादळाचाही माॅन्सूनवर परिणाम होत आहे.

माॅन्सूनने काल कोकण, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये प्रगती केली होती. पण आज माॅन्सूनने प्रगती केली नाही. माॅन्सून कालच्याच ठिकाणावर आज ठाण मांडून होता. आजही माॅन्सूनची सिमा रत्नागिरी, कोप्पाल, पुट्टापारथी, श्रीहरीकोटा, मालदा आणि फोरबेसगंज या भागात होती.

चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकणार

बिपरजाॅय चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. चक्रीवादळ देवभुमी द्वारकेपासून ईशान्येला २८० किलोमीटर, पोरबंरच्या वायव्यला ३०० किलोमीटर, जखाऊ बंदराच्या वायव्येला ३१० किलोमीटर आणि पाकिस्तानमधील कराचीच्या ४५० किलोमीटर अंतरावर आहे. बिपरजाॅय चक्रीवादळ आज रात्री उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.

त्यानंतर हे चक्रीवादळ १५ जूनला सायंकाळी गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची यांच्या लगतच्या जखाऊ बंदराजवळ धडकण्याची शक्यता आहे. जखाऊ बंदर हे गुजरातमध्ये आहे. यावेळी १५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agristack Farmer ID: राज्यातील १.४४ कोटी शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी; उर्वरित शेतकऱ्यांनीही फार्मर आयडी काढण्याचे कृषिमंत्र्यांचे आवाहन

Non-Irrigation Water : बिगर सिंचन पाणी आरक्षणाचा शेतीला मोठा फटका; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ!

District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीवरून राजकारण तापले; 'मला सोडून निवडणूक बिनविरोध करायची होती', लंकेंचा हल्लाबोल

Sugarcane Workers: ऊस तोडणी मजुरांसाठी शेतातच पाण्याच्या टाक्या शेतकऱ्यांच्या उपक्रमाचे स्वागत

Sugarcane Harvesting : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर; परिसरात बेकायदेशीर ऊस तोडणी जोरात!

SCROLL FOR NEXT