Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain : माॅन्सूनची वाटचाल २ दिवसांनंतर पुन्हा सुरु; राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढला

Weather Update : माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील ३ दिवसांमध्ये माॅन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनने आजही काही भागात प्रगती केली. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील ३ दिवसांमध्ये माॅन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तर विदर्भात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला. 

आज मॉन्सूनची अरबी समुद्रातून वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. मॉन्सून ३१ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापुर्वीच वर्तविला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्राच्या आणखी काही भागासह लक्षद्वीप बेटांवर मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान आहे.

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील ३ दिवसात माॅन्सून दक्षिण अरबी समुद्र, उर्वरित मालदीव आणि कोमोरीन भाग, लक्षद्वीपचा आणखी काही भाग, केरळ, आग्नेय आणि मध्य बंगालचा उपसागर तसेच ईशान्य भारतातील काही भाग व्यापे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

मॉन्सूनचे आगमन तोंडावर आले असतानाच देशाच्या वायव्य आणि मध्य भागात तीव्र उन्हाळा अनुभवायला मिळत आहे. विदर्भातही सूर्याचा प्रकोप कायम असल्याने ब्रह्मपुरी येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४७.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. उद्या विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाट येण्याचा येलो अलर्ट देण्यात आला. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका-कमी अधिक होण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT