Monsoon Update 2023 Agrowon
हवामान

Monsoon Update 2023 : माॅन्सूनची आणखी काही भागांमध्ये चाल!

Monsoon Update In Maharashtra : महाराष्ट्रात काल दाखल झालेल्या माॅन्सूनची वाटचाल वेगाने सुरु आहे. आजही माॅन्सूनने राज्यातील आणखी काही भागांमध्ये वाटचाल केली.

Team Agrowon

Monsoon News : महाराष्ट्रात काल दाखल झालेल्या माॅन्सूनची वाटचाल वेगाने सुरु आहे. आजही माॅन्सूनने राज्यातील आणखी काही भागांमध्ये वाटचाल केली. त्यासोबत ईशान्येतील काही राज्यांचाही भाव व्यापला.

मॉन्सून ८ जून रोजी देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये डेरेदाखल झाला होता. त्यानंतर माॅन्सूनने मजल दरमजल करत प्रवास सुरु केला.

काल माॅन्सूनने वेगाने वाटचाल करत कर्नाटक, तमिळनाडूचा आणखी काही भाग, संपूर्ण गोवा, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत वाटचाल केली होती.

बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल झाला होता. साधारणतः ७ जूनपर्यंत तळकोकणात येणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने दाखल झाला.

माॅन्सूनने आज कोकणातील काही भागांमध्ये प्रगती केली. सोबतच कर्नाटक, तमिळनाडूचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, उत्तर पश्चिम बंगालचा बहुतेक भाग आणि सिक्कम तसेच बिहारच्या काही भागांमध्ये माॅन्सून दाखल झाला. आज माॅन्सूनची सिमा रत्नागिरी, कोप्पाल, पुट्टापारथी, श्रीहरीकोटा, मालदा आणि फोरबेसगंज या भागात होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT