Monsoon Rain Update Agrowon
हवामान

Monsoon Rain Update : रविवारनंतर मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता

Monsoon Rain : ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे वाटचालीवर परिणाम

Team Agrowon

Monsoon Biporjoy : पुणे : अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ (Biporjoy ) चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम होत आहे. रविवारी (ता. ११) कोकणातील रत्नागिरीपर्यंत पोहोचल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) पुढील चाल मंदावली आहे.

मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण तयार होत असल्याने रविवारनंतर (ता.१८) मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यंदा मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले. देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये मॉन्सून सात दिवस उशिराने ८ जून रोजी डेरेदाखल झाला. त्यानंतर १० जून मॉन्सूनने केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीवर मॉन्सूनने धडक दिली होती.

रविवारी (ता. ११) मॉन्सूनने कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात प्रगती केली आहे. सोमवारी (ता. १२) दक्षिण भारताच्या काही भागासह, संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीमसह, पश्चिम बंगाल, बिहारच्या काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली.

सुरुवातीला ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे पश्‍चिम किनारपट्टीवर चाल केल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल अडखळली आहे. वादळ उत्तरेकडे सरकताच गुजरातच्या किनाऱ्यालगत ढगांची दाटी झाली आहे.

मात्र महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान आहे. दरम्यान, मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारताच्या आणखी काही भागांत १८ ते २१ जून दरम्यान मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...
- मॉन्सूनची वाटचाल काहीशी अडखळली
- चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताच गुजरातच्या किनाऱ्यालगत ढगांची दाटी


- महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान
- दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारताच्या आणखी काही भागांत १८ ते २१ जून दरम्यान प्रगती शक्य

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Latur APMC : लातूर बाजार समिती होणार ‘राष्ट्रीय बाजार’

MSP Procurement Center : आधारभूत खरेदी केंद्रांची संख्या वाढवा ः अमोल येडगे

PM Kisan 21st Installment Date: शेतकऱ्यांना दिवाळीत पीएम किसानचा २१ वा हप्ता मिळेल का?; तपासा तुमचे लाभार्थी स्टेटस

Crop Insurance Payment : सिंधुदुर्गात बागायतदारांना विमा वितरणास सुरुवात

Crop Damage Survey : पीकहानीचे पंचनामे सुरूच; कमी मनुष्यबळाचा परिणाम

SCROLL FOR NEXT