Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Rain: माॅन्सून पुन्हा सुसाट; मराठवाडा, खानदेशसह मध्य महाराष्ट्र व्यापला; उद्यापर्यंत संपूर्ण विदर्भही काबीज करणार

Maharashatra Weather Update: राज्यात मान्सूनने आज मोठी झेप घेतली असून संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश व्यापले आहेत. मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून विदर्भातही मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात माॅन्सूनने आज मोठी झेप घेतली. माॅन्सूनने आतापर्यंत संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा काबीज केला. तर विदर्भातील बहुतांशी भागही व्यापला. माॅन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने राज्याच्या अनेक भागात पाऊही सुरु झाला आहे.

यंदा माॅन्सून राज्यात लवकर येण्याचा विक्रम झाला. माॅन्सून अपेक्षेपेक्षा लवकर आला. मात्र २६ मे रोजी राज्याचा निम्मा भाग व्यापल्यानंतर माॅन्सूनने एकाच जागेवर जवळपास २० दिवस मुक्काम केला होता. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण नसल्याने माॅन्सूनने प्रगतीच केली नव्हती. तसेच पावसानेही उघडीप दिली होती. मात्र हवामान पोषक होत असल्याने १४ जूनपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भातही अनेक भागात जोरदार सरी झाल्या. 

पोषक हवामान असल्याने माॅन्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती होती. त्यामुळे माॅन्सूनने आज राज्याचा बहुतांशी भाग व्यापला. माॅन्सूनने आज संपूर्ण कोकण, खानदेशसह संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापला. तर विदर्भातही बहुतांशी भागात प्रवेश केला. माॅन्सूनने छत्तीसगड आणि ओडिशा राज्यातही आणखी काही भागात प्रगती केली. तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशात प्रवेश केला. 

माॅन्सूनची सिमा आज गुजरातमधील वेरावल, भावनगर आणि वडोदरा तर मध्य प्रदेशातील खरगोन, महाराष्ट्रातील विदर्भ, छत्तीसगडमधील दूर्ग, ओडिशातील बारगर आणि चांदबली तसेच पश्चिम बंगालमधील बालूरघाट भागात होती. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे माॅन्सून पुढील २४ तासांत विदर्भाचा उरलेला भाग व्यापणार आहे. तसेच छत्तीसगड, ओडिशा, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात दाखल होईल.  

तर हिमालयाकडील पश्चिम बंगालचा भाग आणि सिक्कीमचा उरलेला भाग पुढील २४ तासांत माॅन्सून व्यापेल. तर पुढील २ दिवसांत माॅन्सून पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंडचा काही भाग, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात माॅन्सून दाखल होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT