Monsoon Update 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023 : माॅन्सूनची केरळ, तमिळनाडूपर्यंत मारील मजल; दोन दिवसांमध्ये कर्नाटकात पोचणार : हवामान विभाग

मॉन्सूननं वाटचाल करत दक्षिण अरबी समुद्र,मध्य अरबी समुद्र, संपूर्ण लक्षद्वीप बेटे आणि केरळच्या बहुतांश भागातसह तामिळनाडू, कोमोरीन, मनारचा काही भाग व्यापला आहे.

Team Agrowon

Monsoon Update IMD : मागील सहा दिवसांपासून थबकलेल्या मॉन्सूनने पुन्हा प्रगत केली आहे. मॉन्सून गुरुवारी (ता.८) केरळात दाखल झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. मॉन्सूननं वाटचाल करत दक्षिण अरबी समुद्र,मध्य अरबी समुद्र, संपूर्ण लक्षद्वीप बेटे आणि केरळच्या बहुतांश भागातसह तामिळनाडू, कोमोरीन, मनारचा काही भाग व्यापला आहे.

तब्बल सहा दिवस एकाच जागेवर ठाण मांडून असलेल्या माॅन्सूनने शेवटी देशात प्रवेश केला. केरळमध्ये माॅन्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. तर दक्षिणेतील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली.

माॅन्सूनने आज केरळ आणि तमिळनाडूतील अनेक भागांपर्यंत मजल मारली. तर पुढील दोन दिवसांमध्ये माॅन्सून आणखी प्रगती करेल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला.

देशात दाखल होण्यासाठी माॅन्सूनने यंदा आठ दिवस उशीर केला. एरवी माॅन्सून एक जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. यंदा ४ जूनला माॅन्सून देशात येईल, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला होता. पण बिपरजाॅय चक्रीवादळामुळे माॅन्सूनची वाटचाल थबकली होती.

पण चक्रीवादळी पुढे सरकल्यानंतर माॅन्सूनने आज प्रवेशव्दार असलेल्या केरळमध्ये प्रवेश केला. त्यामुळे माॅन्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकरी आता माॅन्सूनचा पाऊस सुरु होण्याची वाट पाहत आहेत.

मागील २४ तासांमध्ये ईशान्य अरबी समुद्रावर ढगांची रेलचेल वाढली आहे. अरबी समुद्रात पश्चिमेकडून साडेचर किलोमीटर उंचीपर्यंत वारे वाहत आहेत. पश्चिमेकडून वाहऱ्या वाऱ्याची उंची कमी झाली. केरळमध्ये मागील २४ तासांमध्ये सर्वदूर पाऊस पडत आहे. त्यामुळे केरळमध्ये माॅन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

या भागात पोचला माॅन्सून

माॅन्सूनने आज दक्षिण अरबी समुद्र, मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप, करेळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूचा बहुतांशी भाग, कोमोरीनचा उर्वरित भाग, मध्य आणि ईशान्या बंगालचा उपसागर या भागात प्रगती केली, असे हवामान विभागाने जाही केले.

दोन दिवसांत आणखी वाटचाल करणार

माॅन्सूनने आज केरळला धडक दिली. तमिळनाडूतील काही भागांमध्ये प्रगती केली. पुढील ४८ तासांमध्ये म्हणजेच दोन दिवसांमध्ये मध्य अरबी समुद्रात आणखी प्रगती करण्यास अनुकूल स्थिती आहे, असे हवामान विभागाने सांगितले.

तसेच उर्वरित केळ, तमिळनाडूचा काही भाग, कर्नाटकाचा काही भाग आणि बंगालच्या ईशान्य भागात माॅन्सून पुढील दोन दिवसांमध्ये प्रगती करण्यास पोषक वातावरण आहे, असेही हवामान विभागाने जाहीर केले. माॅन्सूनची पुढील दोन दिवसांमध्ये वाटचाल कशी राहू शकते? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Blockchain Technology: कृषी पुरवठा साखळीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान

Cotton Farming: कपाशीच्या शाश्‍वत उत्पादनासाठी काटेकोर नियोजनावर भर

Rural Banks: गरिबांना अखेर वाली तो कोण?

Bogus Agriculture Inputs: बनावटगिरीला हवा कायद्याचा धाक

Agriculture Support: भीज पावसामुळे ऊस, तरकारी पिकांना नवसंजीवनी

SCROLL FOR NEXT