Pre-Monsoon Works : मॉन्सूनपूर्व कामांत हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई : रेखावार

Flood Management : संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार सर्व कामे येत्या १० जूनपूर्वी पूर्ण करावीत.
Pre-monsoon
Pre-monsoon Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार सर्व कामे येत्या १० जूनपूर्वी पूर्ण करावीत. मॉन्सूनपूर्व कामात हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.

मॉन्सूनपूर्व तयारीबाबत जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

नदी, ओढ्याचे पाणी रस्त्यावर येणाऱ्या ठिकाणी नागरिक वाहने पाण्यात घालणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पाण्याखाली जाणाऱ्या पुलांच्या व रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स व नागरिकांना माहिती देणारे बॅनर तयार करून घ्या.

भूस्खलन होणारे रस्ते, धोकादायक वळणांचे रस्ते, वाहन चालवताना वाहन चालकांना अडथळा निर्माण करणारी रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे आदींची माहिती घेऊन तत्काळ उपाययोजना करा. धोकादायक इमारतींची जलदगतीने दुरुस्ती करून घ्या.

पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिक व जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करा. जनावरांच्या चारा छावण्या उभारण्यासाठीची कार्यवाही वेळेत करा, अशा सूचना त्यांनी केल्या.

Pre-monsoon
Pre-Monsoon Review Meeting : मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीची सांगता

आपत्कालीन परिस्थितीत काम करताना अडचण निर्माण होऊ नयेत, यासाठी त्या-त्या विभागांचे नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवून तीन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करा. या कालावधीत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांची संपर्क क्रमांकासह यादी तत्काळ जिल्हा प्रशासनाला सादर करा. १५ जूननंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करू नयेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली. रस्त्यावर पाणी येणाऱ्या ठिकाणी बॅरिकेड्स तसेच आवश्यक त्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.

या वेळी जिल्हा परिषदेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी तर जलसंपदा विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी मॉन्सूनपूर्व तयारीबाबत केलेल्या नियोजनाची माहिती दिली.

पूरपरिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध ठेवल्याची माहिती देऊन महावितरणच्या वतीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता अंकुर कावळे यांनी दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने प्रसाद संकपाळ यांनी माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com