Monsoon 2025 Agrowon
हवामान

Monsoon 2025: माॅन्सून मराठवाडा विदर्भात दाखल; राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट

Orange Alert: माॅन्सूनने आज राज्यात मोठी झेप घेतली. माॅन्सून मराठवाडा आणि विदर्भात पोचला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात माॅन्सून दाखल झाला.

Team Agrowon

Weather Update : माॅन्सूनने आज राज्यात मोठी झेप घेतली. माॅन्सून मराठवाडा आणि विदर्भात पोचला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात माॅन्सून दाखल झाला. तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा काही भागही माॅन्सूनने व्यापला. तसेच संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापत माॅन्सून पुढे सरकला. तर राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली.

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने माॅन्सूनने आज मोठी झेप घेतली. माॅन्सूनने राज्यात मोठी वाटचाल केली. राज्यात माॅन्सून मराठवाडा आणि विदर्भातही पोचला. माॅन्सूनने आज अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्हा व्यापला. तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात माॅन्सून पोचला आहे.

माॅन्सूने दक्षिण भारतातही प्रगती केली. माॅन्सूनने आज संपूर्ण कर्नाटक राज्य व्यापले. तसेच आंध्र प्रदेशचा उरलेला भाग व्यापत राज्य काबीज केले. तेलंगणाच्याही बहुतांशी भागांत माॅन्सून पोचला आहे. तर छत्तीसगड आणि ओडिशातही माॅन्सून पोचला असून काही भागात चाल केली. तसेच पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराचा पूर्ण भाग माॅन्सूनने आज व्यापला.

माॅन्सूनची सिमा आज मुंबई, अहिल्यानगर, तेलंगणातील अदिलाबाद, छत्तीसगडमधील दंतेवाडा, ओडिशातील रायगडा, त्रिपुरातील अगरताळा आणि आसाममधील गोलपारा भागात होती. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ दिवसांत माॅन्सून आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे. माॅन्सून पुढील २ दिवसांत ईशान्य भारतातील राज्यांचा उरलेला भाग, छत्तीसगड आणि ओडिशाचा काही भाग, तसेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात पोचण्याची शक्यता आहे.

राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या राज्याच्या बहुतांशी भागात पावसाचा अंदाज दिला. तर शुक्रवारनंतर पाऊस कमी होत जाईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाटमाथा, विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. उद्या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला.

शुक्रवारी कोकण आणि अध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. शनिवारी आणि रविवारीही दक्षिण कोकण, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI WhatsApp Chatbot : इक्रीसॅट व आयसीएआरचा एआय आधारित प्रकल्प महाराष्ट्रात; पेरणी, कीडरोग, हवामानाचा मिळणार सल्ला

Jayakwadi Dam: जायकवाडी ८९.६० टक्क्यांवर 

Fertilizer Sales: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ई-पॉसवरील खतसाठ्यात तफावत नको

Malegaon Blast: मालेगांव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

Soil Fertility: जमीन सुपीकतेसाठी हिरवळीचे पीक

SCROLL FOR NEXT