IMD Technology Update: आयएमडीने अचूक हवामान अंदाजासाठी स्वीकारली नवीन प्रणाली?

Hawaman Andaj: उष्णकटिबंधीय भागांमध्ये अधिक अचूक आणि तपशीलवार हवामान अंदाज देण्यासाठी हवामान विभागाने आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले आहे. या नव्या प्रणालीमुळे हवामान अंदाजाची अचूकता ६४ टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असा दावा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या हवामानशास्त्र विभागाने केला आहे. त्यामुळे आता हवामान विभाग शेतकऱ्यांना गाव पातळीवर अधिक अचूक हवामान माहिती देऊ शकतो का? शेतकऱ्यांना त्यांचा शेती निर्णय घेण्यासाठी विश्वसनीय हवामान अंदाज मिळू शकतो का? आणि हा अचूक हवामान अंदाज कुठे आणि कसा मिळवता येईल? याचीच सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

उष्णकटिबंधीय भागांमध्ये हवामान बदलांचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत असल्याने, अचूक हवामान अंदाज देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यासाठी हवामानशास्त्र विभागाने एक नवी आणि अत्याधुनिक प्रणाली स्वीकारली असून, यामुळे अंदाजाची अचूकता ६४ टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असा दावा करण्यात आला आहे. यामुळे हवामान विभाग आता गाव पातळीवर अधिक सखोल आणि अचूक माहिती देऊ शकतो. शेतकऱ्यांना त्यांच्या शेती निर्णयांसाठी योग्य हवामान अंदाज मिळणे शक्य होईल. पेरणी, फवारणी, काढणी यासारख्या कामांची आखणी अधिक योजनाबद्धपणे करता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com