Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023 : मॉन्सूननं संपूर्ण देश व्यापला; आज कोणत्या भागात पाऊस?

Monsoon Rain Update : अंदमान समुद्रात यंदा उशिराने १९ मे रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने ३० मे रोजी संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह व्यापला. त्यानंतर केरळमध्ये आगमन देखील लांबले.

Team Agrowon

Weather Update : यंदा मॉन्सूननं सर्वसाधारण तारखेच्या सहा दिवस आधीच संपूर्ण देश व्यापला आहे. दरवर्षी सर्वसाधारण ८ जुलै रोजी मॉन्सून संपूर्ण देशात पोहचतो. परंतु यंदा मात्र आगमन लांबलेल्या मॉन्सूननं जोरात मुसंडी मारत रविवारी संपूर्ण देश व्यापल्याचं भारतीय हवामान शास्त्र विभागानं जाहीर केलंय. परंतु राज्यातील बहुतांश भागात पेरणी योग्य पाऊस न झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.

मॉन्सूननं रविवारी राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागात एंट्री केली. यंदा सुरुवातीला वाट पाहायला लावणाऱ्या मॉन्सूनने यंदा सात दिवस उशिराने (८ जून) केरळमध्ये हजेरी लावली होती. तर दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या (८ जूलै) सहा दिवस आधीच मॉन्सूननं संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केलं.

अंदमान समुद्रात यंदा उशिराने १९ मे रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने ३० मे रोजी संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह व्यापला. त्यानंतर केरळमध्ये आगमन देखील लांबले. ८ जून रोजी केरळात डेरेदाखल झाल्यांनतर ११ जून रोजी मॉन्सूनने कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हजेरी लावली.

‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे तब्बल १२ दिवस पुढील वाटचाल थांबली होती. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरील शाखा बळकट झाल्याने पूर्व भारतात मॉन्सूनची घोडदौड सुरू होती.

२३ जून रोजी मॉन्सूनने पूर्व विदर्भात प्रगती केल्यानंतर २४ जून रोजी महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापला. २५ जूनला विक्रमी वेगानं प्रगती करत संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागात मॉन्सून वारे पोहोचले. रविवारी (ता. २) मॉन्सूनने राजस्थान, हरियाना, पंजाबचा उर्वरित भागात मजल मारून संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागानं स्पष्ट केले.

सोमवारी कोकणातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो इशारा हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. सोमवारी सकाळपर्यंत राज्यातील मराठवाड्यातील धाराशीव, बीड, लातूर, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली.

तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, तसेच ठाणे, पालघर जिल्हयासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव भागात पावसाच्या सरी पडल्या. राज्यात आज सर्वाधिक पाऊस १३ सेंमी पावसाची नोंद दोडामार्ग येथे झाली.

नैऋत्य मोसमी वाऱ्यानं संपूर्ण देश व्यापल्यामुळे कर्नाटक किनारपट्टी आणि संपूर्ण कर्नाटक तसेच ईशान्य भारतातील हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे.

वायव्यकडील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात तुरळक ठिकाणी वीज, मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान आज राज्यातील दोडामार्ग येथे सर्वाधिक १३ सेमी तर भिवंडी १२ सेंमी पावसाची नोंद झाली.

राज्यातील नाशिक, पुणे, ठाणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT