Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023 : माॅन्सून आला; पण पावसाचं काय? माॅन्सूनने देशाचा बहुतांशी भाग व्यापला

Today Monsoon Update : षोषक हवामान असल्याने माॅन्सून एक्सप्रेसचा प्रवास वेगाने सुरु आहे. माॅन्सूनने आजही देशातील काही भागांमध्ये प्रगती केली. तर राज्यासह देशाच्या अनेक भागात ठिकठिकाणी जोरदार सरी होत आहेत.

Team Agrowon

Monsoon Rain Update : पोषक हवामान असल्याने माॅन्सून एक्सप्रेसचा प्रवास वेगाने सुरु आहे. माॅन्सूनने आजही देशातील काही भागांमध्ये प्रगती केली. तर राज्यासह देशाच्या अनेक भागात ठिकठिकाणी जोरदार सरी होत आहेत. राजस्थान, हरियाना आणि पंजाबचा काही भाग वगळता उर्वरित देशात माॅन्सून दाखल झाला आहे.

माॅन्सूनने रविवारी आणि सोमवारी वेगाने वाटचाल केली. रविवारी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड व्यापून गुजरात, राजस्थान, हरियाना, जम्मू- काश्मीरच्या काही भागात दाखल झाला होता.

तर सोमवारी उत्तर अरबी समुद्राच्या आणखी भागात, तसेच गुजरात, राजस्थान, हरियाना आणि पंजाबच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल झाला होता. जम्मू, काश्मिर आणि लडाखचा उर्वरित भागही माॅन्सूनने व्यापला. माॅन्सूनची सिमा पोरबंदर, अहमदाबाद, उदयपूर, नरनाऊल, फिरोजपूरपर्यंत होती.

आजही माॅन्सूनने देशातील काही भागात प्रगती केली. माॅन्सूनने आज उत्तर अरबी समुद्राचा बहुतांशी भाग, संपूर्ण गुजरात आणि राजस्थानच्या बहुतांशी भागात प्रगती केली. माॅन्सूनची सिमा आज जोधपूर, सिकर, नरनौल, फिरोजपूरपर्यंत होती.

तसेच माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ दिवसांमध्ये माॅन्सून राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती करेल. तर हरियाना आणि पंजाबचा संपूर्ण भाग २ दिवसांमध्ये व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उत्तर छत्तीसगड आणि परिसरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. हे कमी दाब क्षेत्र उत्तर वायव्येकडे सरकून मध्य प्रदेशच्या वायव्य भागात पोचण्याची शक्यता आहे.

आज राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यातील काही भागात तर विदर्भातील अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे. तर पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेशातील बहुतांशी ठिकाणी मुसळधार सरी कोसळत आहेत, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

माॅन्सूनने रविवार राज्याचा संपूर्ण भाग व्यापला. पण राज्यातील अनेक भागात अद्यापही जोरदार पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी पडलेल्या पावसावर पेरण्या सुरु केल्या. पण सर्वदूर जोरदार पाऊस होत नाही, तोपर्यंत पीकं जगणार नाहीत, असं शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT