Monsoon Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon 2025 : मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला

Weather Update: यंदा विक्रमी वेगाने महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतरही सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस उशिराने मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे.

अमोल कुटे

Pune News: नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. १७) विदर्भाच्या उर्वरित भागासह संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये असलेल्या दोन कमी दाब क्षेत्रांमुळे चाल मिळाल्याने तब्बल तीन आठवड्यांची विश्रांती घेतल्यानंतर मॉन्सूनने वेगाने प्रगती केली आहे. यंदा विक्रमी वेगाने महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतरही सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस उशिराने मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे.

यंदा मॉन्सून विक्रमी वेगाने आगमन करत २४ मे रोजी केरळसह कर्नाटक किनारपट्टीवर दाखल झाला. २५ मे मॉन्सूनने तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगडपर्यंत धडक दिली. १९९० नंतर प्रथमच मॉन्सून इतक्या लवकर महाराष्ट्रात धडकला. २६ मे रोजी मुंबईसह पुणे, धाराशीव पर्यंत मॉन्सून पोहोचला होता. तर २८ मे रोजी मॉन्सूनने पुढे चाल करत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या आणखी काही भागासह विदर्भात प्रगती केली.

आगमनाचा वेग पाहता यंदा मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्रात लवकर पोहोचला असे वाटत असतानाच मॉन्सूनची चाल थबकली. मुंबई, अहिल्यानगरसह बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागापर्यंत मजल मारल्यानंतर मात्र अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल थांबली होती.

तब्बल तीन आठवड्यानंतर सोमवारी (ता. १६) जून रोजी मॉन्सूनने पुन्हा सक्रिय होत विदर्भाच्या उत्तर भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड ओडिशाच्या आणखी काही भागात प्रगती केली. साधारणतः १५ जूनपर्यंत राज्य व्यापणारा मॉन्सून यंदा १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

मंगळवारी मजल मारत उर्वरित विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण ओडिशा, पश्चिम बंगाल तसेच गुजरात, छत्तीसगड राज्यांच्या बहुतांशी भागात प्रगती केली आहे. मध्य प्रदेश, झारखंड, बिहार राज्यांच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे. पुढील दोन दिवसांत अरबी समुद्र, गुजरात, छत्तीसगडचा उर्वरित भाग, मध्य प्रदेश, बिहार, झारखंडचा आणखी काही भाग, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Local Body Election Results 2025: भाजप सुसाट! मुश्रीफांसह अनेक दिग्गजांना मोठा धक्का, जाणून घ्या कोण, कुठे विजयी?

Cotton Crop Damage: प्रतिकूल हवामान, गुलाबी बोंडअळीचा मोठा फटका! कापूस पीक काढून शेतकरी हरभरा पेरणीकडे वळले

Mango Crop Disease: आंबा पिकावरील ‘लीफ वेबर’

Goat Health Care: शेळ्यांमधील फुप्फुसदाहाची लक्षणे अन् उपाययोजना

Women Success Story: वडिलांचे शेती प्रेम, तळमळीने डॉक्टर कन्या झाली शेतकरी

SCROLL FOR NEXT