Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain 2025: माॅन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; माॅन्सून २ दिवसांत देशाचा बहुतांशी भाग व्यापणार

Monsoon in Maharashtra: माॅन्सून आज संपूर्ण महाराष्ट्र व्यापत पुढे सरकला आहे. माॅन्सूनने बहुतांशी गुजरात व्यापला तसेच झारखंड आणि बिहारपर्यंत मजल मारली.

Anil Jadhao 

Monsoon Update Today: माॅन्सून आज संपूर्ण महाराष्ट्र व्यापत पुढे सरकला आहे. माॅन्सूनने बहुतांशी गुजरात व्यापला तसेच झारखंड आणि बिहारपर्यंत मजल मारली. राज्यात अनेक भागात माॅन्सूनच्या सरीही पडत आहेत. पुढील ५ दिवस हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.

माॅन्सूनने आजही मोठी चाल केली. काल माॅन्सनने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण काबीज करत विदर्भाचा बहुतांशी भाग व्यापला होता. आज माॅन्सूनने विदर्भाचा उरलेला भाग व्यापत संपूर्ण महाराष्ट्र काबीज केला. तसेच माॅन्सून झारखंड आणि बिहारपर्यंत पोचला. माॅन्सूनने आज गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात प्रवेश केला. छत्तीसगडचा बहुतांशी भाग आणि संपूर्ण पश्चिम बंगालही व्यापला.

माॅन्सूनची सिमा दिसा, इंदोर, पंचमारी, मांडला, अंबिकापूर, हजारीबाग आणि सुपौल भागात होती. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ दिवसांत माॅन्सून गुजरात व्यापून राजस्थानमध्ये प्रवेश करेल. तसेच छत्तीसगड, झारखंड आणि बिहार व्यापण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशातही माॅन्सून चाल करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यात माॅन्सून सक्रीय झाल्याने अनेक भागात जोरदार सरी पडत आहे. हवामान विभागाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज आणि उद्या जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यातही पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पुढील ३ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer shortage : देशात खताचा साठा पुरेसा, केंद्र सरकारचा दावा; शेतकऱ्यांची मात्र खत टंचाईने कोंडी

Fruit Packaging: भारतीय फळनिहाय पॅकेजिंग पद्धती

Agriculture Minister: विद्यार्थी वसतिगृहाला कृषिमंत्र्याची अचानक भेट

Agriculture Land Document: महसूल, दिवाणी कोर्टासाठी फेरफार पत्रक

Citrus Farming: कागदी लिंबू हस्त बहराचे नियोजन

SCROLL FOR NEXT