Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update 2023 : मॉन्सूनने अंदमान-निकोबार बेटसमूह व्यापला

दोन दिवसांत अरबी समुद्रात दाखल होण्याचे संकेत

Team Agrowon

Weather Update : पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १९) अंदमानात आगमन झाले. त्यानंतर मॉन्सूनची (Monsoon) थांबलेली वाटचाल तब्बल ११ दिवसांनी पुन्हा सुरू झाली आहे.

मंगळवारी (ता. ३०) संपूर्ण अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मोसमी वाऱ्यांनी मजल मारली आहे. अरबी समुद्रातील आगमनास पोषक हवामान होत असून, दोन दिवसांत मालदीव आणि कोमोरीन भागांत मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस अगोदरच (ता. १९ मे) दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली होती.

मंगळवारी (ता. ३०) संपूर्ण अंदमान, निकोबार बेटसमूह आणि अंदमान समुद्रासह पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने येत्या दोन दिवसांत बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्रातही मॉन्सूनच्या आगमनाचे संकेत आहेत.

अरबी समुद्रातील मालदीवसह, दक्षिण भारत आणि पश्‍चिम श्रीलंकेलगत असलेल्या कोमोरीन भागात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यातच मॉन्सून यंदा ४ जूनपर्यंत केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT