Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023: माॅन्सूनचा आजही मुक्काम: उन्हाचा चटका कायम!

Monsoon Update : यंदा जून महिन्यात बहुतांशी भागात केवळ उन्हाचाच चटका जाणवत आहे. पण आजही माॅन्सूनची प्रगती झाली नाही.

Team Agrowon

Weather Update : देशातील बहुतांशी भागात पेरणीयोग्य पावसाची अद्यापही प्रतिक्षा कायम आहे. गेल्या आठवडाभरात माॅन्सूनने केवळ एकच दिवस प्रगती केली. माॅन्सूनची वाटचाल अडखळत सुरु असल्याने शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली.

यंदा जून महिन्यात बहुतांशी भागात केवळ उन्हाचाच चटका जाणवत आहे. पण आजही माॅन्सूनची प्रगती झाली नाही.

मागील आठवड्यात माॅन्सूनने केवळ सोमवारीच प्रगती केली होती. त्यानंतर रविवारपर्यंत माॅन्सून एकाच जागेवर होता. चालू आठवड्यातही माॅन्सूनने केवळ सोमवारीच प्रगती केली. बिपरजाॅय चक्रीवादळ निवळल्यानंतर माॅन्सूनची रखडलेली वाटचाल सोमवारी सुरु झाली होती. त्यानंतर मात्र मंगळवारी आणि आज म्हणजेच बुधवारी माॅन्सूनचा प्रवास अडखळला होता.

माॅन्सूनने सोमवारी कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, बंगालच्या उपसागरच्या काही भाग, पश्चिम बंगालचा दक्षिण भाग, झारखंडच्या काही भागात प्रगती केली होती. माॅन्सूनची सिमा रत्नागिरी, कर्नाटकचा रायचूर, कावली, कॅनिंग, श्रीनिकेतन, डूमका भागात कायम होती.

पण माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. माॅन्सून पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये दक्षिण द्वापकल्पचा आणखी काही भाग, ओरिसाचा काही भाग, पश्चिम बंगाल तसेच झारखंडचा काही भागात भागात प्रगती करु शकतो.

तसेच बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशाच्या काही भागात माॅन्सूनची प्रगती होऊ शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

मध्य उत्तर प्रदेशच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार आले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक भागात हलका ते मध्यम आणि काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT