Maharashtra Cold  Agrowon
हवामान

Maharashtra Cold : किमान तापमान घटण्याची शक्यता

Weather News : राज्यात किमान तापमानाची नीचांकी नोंद झाल्यानंतर किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. राज्यात गारठा कायम असून, आज (ता. ३१) राज्याच्या किमान तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

Cold Season : पुणे : राज्यात किमान तापमानाची नीचांकी नोंद झाल्यानंतर किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. राज्यात गारठा कायम असून, आज (ता. ३१) राज्याच्या किमान तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी झाला आहे. मंगळवारी (ता. ३०) बिहारमधील मोतीहारी येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये किमान तापमान ६ ते १० अंशांदरम्यान आहे. उत्तर भारतात धुके, थंडीची लाट, थंड दिवस ही स्थिती निवळली आहे.

राज्याच्या तापमानात वाढ झाली असली तरी उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. मंगळवारी (ता. ३०) निफाड वगळता उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या वर सरकला आहे. किमान तापमानाचा पारा १० ते २० अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. ३१) किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३१.५ (१३.६), धुळे ३१ (१०.९), जळगाव ३१.८ (१०.५), कोल्हापूर ३०.७ (१७.९), महाबळेश्‍वर २६.२ (१४.७), मालेगाव ३१.४ (१४.२), नाशिक ३०.४ (१२.३), निफाड ३०.५ (९.८), सांगली ३१.७ (१६.८), सातारा ३१.२ (१५.५), सोलापूर ३३.२ (१७.४), सांताक्रूझ ३३ (१८.४), डहाणू २७.५

(१७.४), रत्नागिरी ३३ (१९.५), छत्रपती संभाजीनगर ३०.६ (१३.६), नांदेड ३०.६ (१७.२), परभणी ३१.४ (१५.५), अकोला ३२.४ (१५), अमरावती ३०.८ (१४.६), बुलडाणा ३०.४ (१५), ब्रह्मपुरी ३३.४ (१५.८), चंद्रपूर ३१.२ (१४.४), गडचिरोली ३०.४ (१४.४), गोंदिया २९.६ (१३.९), नागपूर ३०.४ (१५), वर्धा ३१.५(१५.९), वाशीम ३२ (१३.४), यवतमाळ ३२.२ (१३.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price: कोल्हापुरात ऊसदराची कोंडी कायम; साखर कारखानदारांच्या भूमिकेकडे लक्ष

Farmer Compensation Delay: केवायसी पूर्ण नसल्याने शेतकऱ्यांचा पीक नुकसान मदतनिधी रखडला

Soil Testing: माती परीक्षणातून खतांचा संतुलित वापर करा; पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Ujani AI Data Center: उजनीतील ‘एआय डेटा सेंटर’ला विरोध

Financial Assistance for Farmers: शेतकरी, शेतमजुरांना स्वतंत्र आर्थिक साह्य द्या; खासदार भगरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT