Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Rain Forecast : विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज, तसेच उर्वरित तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात श्रावण सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : गुजरातमधील कमी दाब क्षेत्राने बाष्प खेचून नेल्याने राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. आज (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा (यलो अलर्ट) आहे. विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज, तसेच उर्वरित तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात श्रावण सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कमी दाबांच्या क्षेत्रांचा प्रभाव कायम असतानाच मॉन्सूनचा आस दोन्ही प्रणाली व बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. यातच दक्षिण गुजरातपासून मध्य केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. यातच राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ३०.६ अंश तापमानाची नोंद झाली.

कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी (ता. २७) पावसाने उघडीप दिल्याने ऊन सावल्यांच्या खेळात श्रावणसरी कोसळत आहे. आज (ता. २८) रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांच्या खेळात श्रावण सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वादळी प्रणाली अरबी समुद्राकडे सरकतेय

पूर्व राजस्थानातील वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) अरबी समुद्राकडे सरकत आहे. मंगळवारी (ता. २७) ही प्रणाली गुजरातच्या पाटणपासून १० किलोमीटर पश्चिमेकडे, दिसा पासून ६० किलोमीटर नैर्ऋत्येकडे, अहमदाबादपासून १०० किलोमीटर वायव्येकडे होती. वायव्य झारखंड आणि परिसरावर कमी दाब क्षेत्र सक्रिय असून उत्तर प्रदेशकडे जाताना विरून जाणार आहे. उद्यापर्यंत (ता. २९) पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT