Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: कमाल-किमान तापमान वाढीचा अंदाज; उन्हाळा लवकर सुरू होण्याची शक्यता!

Weather Update: महाराष्ट्रातील हवामान बदलत असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा उन्हाळी हंगाम लवकर सुरू होऊ शकतो, त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

 डॉ. रामचंद्र साबळे 

Weather Forecast : महाराष्ट्रावर आजपासून शनिवार (ता. ९ ते १५) पर्यंत १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे पहाटे थंड, तर दुपारी अल्प प्रमाणात उष्ण हवामान जाणवेल. यापुढे फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडीचे प्रमाण कमी होत जाईल. सूर्यप्रकाशाचा कालावधीत वाढ होत जाईल. बाष्पीभवनाचा वेग वाढेल. किमान तापमानातही वाढ होत जाईल. त्यामुळे पहाटे व सकाळी थंडीचे प्रमाण कमी कमी होत जाईल. हवामान दुपारी कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील.

राज्यातील काही भागांत काही दिवशी आकाश अल्प प्रमाणात ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. वारे दक्षिणेकडून उत्तर भारताचे दिशेने वाहतील. या वर्षी उन्हाळी हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुढील काही दिवसात राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्य आहे.

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान इक्वॅडोरजवळ २५ अंश सेल्सिअस पर्यंत, तर पेरूजवळ १९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. त्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव सध्या तरी नाही. हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत वाढले असल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढेल. त्यामुळे हवामान अल्पशा प्रमाणात ढगाळ राहणे शक्य आहे.

कोकण :

कमाल तापमान सिंधुदुर्ग, पालघर व रायगड जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअसपर्यंत, तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल. किमान तापमान रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस तसेच ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत काही दिवशी अल्पशा प्रमाणात आकाश ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ७२ ते ७७ टक्के, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी जिल्ह्यात ७० टक्के, रायगड जिल्ह्यात ६६ टक्के, तर ठाणे जिल्ह्यात ५० टक्के राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के आणि पालघर जिल्ह्यात ३४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत ताशी १० ते १३ कि.मी., तर रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ताशी ३ कि.मी. राहील.

उत्तर महाराष्ट्र :

कमाल तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, तर नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस आणि नाशिक जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत काही दिवशी आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ताशी ६ कि.मी., तर नाशिक व धुळे जिल्ह्यांत ताशी १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

मराठवाडा :

कमाल तापमान जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर व हिंगोली जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. मात्र नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल. किमान तापमान धाराशिव, नांदेड व बीड जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर लातूर, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील.

अल्पशा प्रमाणात आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ६१ ते ६४ टक्के, तर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, जालना जिल्ह्यांत ५० ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ४१ ते ४८ टक्के, तर धाराशिव, लातूर, बीड, परभणी जिल्ह्यांत ३५ ते ३८ टक्के राहील. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी १० कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यांत ताशी ३ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पश्चिम विदर्भ :

बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ६० ते ६२ टक्के, तर अमरावती जिल्ह्यात ७२ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३३ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

मध्य विदर्भ :

कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अधूनमधून अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३४ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पूर्व विदर्भ :

कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, तर भंडारा जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात ७६ टक्के, तर चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ७१ ते ७२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३२ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३४ ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग चंद्रपूर जिल्ह्यात ६ कि.मी., तर गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ताशी १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पश्चिम महाराष्ट्र :

कमाल तापमान कोल्हापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान पुणे जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्‍ह्यांत १९ अंश सेल्सिअस, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अधूनमधून अल्प प्रमाणात ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत ८१ टक्के, सातारा जिल्ह्यात ७८ टक्के, सांगली जिल्ह्यात ६७ टक्के, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत ५७ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता पुणे जिल्ह्यात ४१ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात २५ ते ३२ टक्के इतकी कमी राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत ११ कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यात ३ ते ४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

कृषी सल्ला :

- सुरु उसाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत करावी.

- उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत करावी.

- उन्हाळी भेंडी, दोडका, कारली, घोसाळी पिकांची लागवड पूर्ण करावी.

- आंबा पिकावरील तुडतुड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

- जनावरांना लाळ्या व खुरकुत आजाराचे प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

Water Withdrawal Ban: चिकोत्रा नदीकाठावर उपसाबंदी

Farm Roads: पेगरगव्हाण शिवारातील ३० वर्षांपासून बंद शेतरस्ते झाले खुले

Irrigation Water Issue: गाळामुळे गडहिंग्लजला पाटबंधारे लघू प्रकल्पातील साठा अल्प

LPG Cylinder Booking: सिलिंडर संपण्याची भीती, बुकिंग ८८ लाखांवर, गॅस टंचाईवर केंद्रानं काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT