Heat Wave Agrowon
हवामान

Heat Wave : राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात मोठी वाढ

Weather Update : शुक्रवारी आण शनिवारी राज्यातील काही भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने ढगाळ हवामान होऊन, राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. विदर्भातील वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर शुक्रवारी आण शनिवारी राज्यातील काही भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने शुक्रवारी धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर शुक्रवारी पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमधील काही भागात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला. 

मध्यप्रदेश पासून विदर्भ, कर्नाटक, दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात दिवसा उन्हाच्या झळा असह्य होत असतानाच रात्री देखील उष्ण ठरत आहेत. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका चांगलाच वाढत आहे. यातच सकाळपासूनच असलेल्या ढगाळ हवामानामुळे वाढलेला उकाडा रात्रीच्या वेळी कायम राहत आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कर्नूल येथे देशातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तापमानात चढ-उतार होत असला तरी राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या वरच आहे. आज सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड जिल्ह्यात तापमान चांगलेच वाढले होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीचा शब्द पाळू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शेतकऱ्यांना आश्वासन

Inspiring Farmer Story: सुखी संसाराची वाट शोधणारे दाम्पत्य

BJP Mumbai President: भाजपकडून आमदार अमित साटम यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी

Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा कोणताही विचार नाही

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

SCROLL FOR NEXT