Rain Agrowon
हवामान

Marathwada Rain News : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील अनेक मंडळात हलका ते मध्यम पाऊस

Monsoon Rain Update : मराठवाड्यात अनेक भागात मंगळवारी (ता. २७) सकाळपासून सुरू असलेली पावसाची भुरभुर दुपारनंतर मध्यम ते दमदार पावसात परावर्तित झाली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात अनेक भागात मंगळवारी (ता. २७) सकाळपासून सुरू असलेली पावसाची भुरभुर दुपारनंतर मध्यम ते दमदार पावसात परावर्तित झाली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये मध्यम ते दमदार पाऊस झाला.

तर लातूर व धाराशिव जिल्ह्यातील काही मंडळातही पावसाची मध्यम ते दमदार हजेरी लागली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मंडळांमध्ये पावसाची हजेरी दमदार राहिली. जिल्ह्यात सर्व ८३ मंडळात हलकी, मध्यम, दमदार, हजेरी लावणारा पाऊस तब्बल ५० मंडळात २० ते ४८.८ मिलिमीटर दरम्यान बरसला.

जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडळात पावसाची हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लागली. जिल्ह्यातील जालना, अंबड, तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील १५ मंडळात २० ते ५१ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.

बीड तालुक्यासह माजलगाव, धारूर तालुक्यातील काही मंडळात पावसाची हजेरी मध्यम ते दमदार राहिली. जिल्ह्यातील १३ मंडळात २० ते ४३ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील सर्व ६० मंडळात तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला.

अहमदपूर, निलंगा, रेणापूर, चाकूर तालुक्यातील काही मंडळात पावसाची हजेरी दमदार राहिली. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तीन, भूम परांडा तालुक्यातील प्रत्येकी एका मंडळात मध्यम पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यातील सर्व ४२ मंडळात पावसाची तुरळक, हलकी, मध्यम हजेरी लागली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT