राज्यात हलक्या पावसाचा अंदाज 
हवामान

Northeast Monsoon : ईशान्य माॅन्सून कधी सक्रिय होणार? राज्यात काही भागात हलक्या पावसाचा अंदाज

Rain update : देशात पुढील काही तासांमध्ये ईशान्य माॅन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Swapnil Shinde

IMD Alert : राज्यात सध्या उन्हाचा चटका चांगलाच वाढत आहे. तर काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. देशात पुढील काही तासांमध्ये ईशान्य माॅन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

माॅन्सून काल म्हणजेच १९ ऑक्टोबर रोजी देशातून माघार घेतली. देशात ४ महिने ११ दिवस मुक्काम ठोकल्यानंतर शेवटी काल माघार घेतली. आता देशात ईशान्य माॅन्सून सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती आहे. पुढील ४८ तासांमध्ये दक्षिण भारतात ईशान्य माॅन्सून सक्रिय होऊ शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. यंदा ईशान्य माॅन्सूनचा जोरही कमीच राहण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले.

राज्याच्या काही भागात आजही पावसाचा अंदाज आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड,  ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : 'पंतप्रधानांशिवाय देवा भाऊचं पानही हालत नाही...'; कॉंग्रेस खासदाराने संसदेत केली कर्जमाफीची मागणी

AI WhatsApp Chatbot : इक्रीसॅट व आयसीएआरचा एआय आधारित प्रकल्प महाराष्ट्रात; पेरणी, कीडरोग, हवामानाचा मिळणार सल्ला

Banana Crop Insurance: केळी पीकविमा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

Aadhaar Seva Kendra: बुलडाणा जिल्ह्यात ४५ नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना

Jayakwadi Dam: जायकवाडी ८९.६० टक्क्यांवर 

SCROLL FOR NEXT