Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Maharashtra Weather Forecast : कमी दाब क्षेत्र निवळल्याने राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा ओसरणार आहे. आज (ता. २९) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे.

Team Agrowon

Pune News : कमी दाब क्षेत्र निवळल्याने राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा ओसरणार आहे. आज (ता. २९) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. विदर्भात विजांसह जोरदार पावसाची, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर ओडिशा आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून, या भागात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगर पासून, नर्नूल, ग्वालेर, सिधी, आंबिकापूर, चांदबली ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून असलेले वाऱ्यांचे जोडक्षेत्र समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे.

कोकण, घाटमाथा, विदर्भात पावसाचा तडाखा सुरूच असून, राज्यातही मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली आहे.

आज (ता. २९) कोकणासह, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ आहे. विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) असून, उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, गोंदिया, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy: शेतकऱ्यांना वीज अनुदान, धानासाठी प्रति क्विंटल २,७०० रुपये हमीभाव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

Flower Growers: पातूरच्या शेतकऱ्यांनी जोपासली फुलशेतीची परंपरा

Pokhara 2.0 Scheme: पोकरा 2.0 अंतर्गत हरितगृह, शेडनेटमधील भाजीपाला व फुलांना सहाय्य; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

Rural Development: कल्पनाताईंनी समर्थपणे सांभाळली ‘ग्राम गौरव’ची धुरा

Lakhpati Didi Scheme: लखपती दीदी २.०! महिलांना मिळणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT