Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold: राज्यातील किमान तापमानात वाढ; उत्तर भारतातील थंडीचे प्रमाणही कमी झाले

Weather Update : राज्यात पुढील काही दिवसांमध्ये थंडी किहीशी वाढू शकते, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : उत्तर भारतातील किमान तापमानात वाढ झाली असून थंडीचा कडाका काहीसा कमी झालेला दिसतो. राज्यातही कालपासून थंडी काहीशी कमी झालेली दिसते.  

उत्तर भारतातील तापमानात वाढ झाली आहे. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तर राजस्थान, ईशान्य मध्य प्रदेश आणि हिमालयाच्या बाजुच्या पश्चिम बंगालच्या बहुतांशी भागात किमान तापमान ७ अंश सेल्सिअश ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

तसेच पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, गंगाकडील पूर्व बंगाल आणि बिहारच्या काही भागात तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने कमी होते. बिहारमधील सबौर येथे देशातील सर्वात कमी ५ अंश सेल्सिअसर तापमानाची नोंद झाली. 

महाराष्ट्रातही अनेक भागात आज थंडीचा कडाका काहीसा कमी झाला होता. राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. राज्यातील बहुतांशी भागांमध्ये किमान तापमान १२ अंश सेल्सिअस ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

तर कमाल तापमानाची १७ अंश सेल्सिअस ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंद झाली होती. राज्यात पुढील काही दिवसांमध्ये थंडी किहीशी वाढू शकते, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT