Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023 : राज्याच्या कोणत्या भागात पाऊस पडणार ? विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार सरींचा अंदाज

Maharashtra Weather Alert : राज्याच्या काही भागांमध्ये हवामान विभागाने आज पावसाचा अंदाज दिला. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Maharashtra Rain News : राज्याच्या बहुतांशी भावात पावसाची उघडीप आहे. उन्हाचा चटकाही वाढलेला दिसतो. तर राज्यात अगदी काही ठिकाणीच पावसाची भूरभूर झाली. आजही हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. मग नेमकं कोणत्या भागात हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज दिला.

राज्याच्या काही भागांमध्ये हवामान विभागाने आज पावसाचा अंदाज दिला. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातील अमवरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी पडतील, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. तसेच राज्यातीलस इतर भागात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडतील, अशीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

तसेच उद्या विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट व्यक्त केला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी होतील, असा अंदाज व्यक्त केला.

तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan Renewal: परभणीत पीककर्ज नूतनीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल कमी

Rural Water Supply: मुरबाड ग्रामीण भाग टँकरमुक्तीच्या दिशेने

Agriculture Conference: माटुंग्यात हवामान बदल, कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया परिषद

Sunflower Farming: सूर्यफूल पिकाच्या शेतीने समृद्धीकडे वाटचाल

Fort Conservation: नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वासात कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT